जळगाव : युवा संवाद कार्यक्रमाला युवकांचा भरघोस प्रतिसाद, श्रीराम नामाचा जयघोष

जळगाव : देशाचे कणखर नेतृत्व तेजस्वी गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचा जळगाव जिल्हा दौरा आज रोजी नियोजित केलेला असून या मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे व भाजपा नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन दुपारी १ वाजता सागर पार्क जळगाव येथे युवकांशी संवाद साधणार आहे.

युवा संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असूनकाही महाविद्यालयीन विद्यार्थी गणवेशातच युवा संवादामध्ये सहभागी झालेले आहेत. भाजपाचे कार्यकर्ते व नेते विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहे. दरम्यान सभामंडप उभारलेल्या जागेवर युवकांनी श्रीरामाच्या नामाचा जयघोष करत कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणीत केला आहे. सभास्थळी श्रीरामाचे गीतांनी वातावरणामध्ये जल्लोष निर्माण झालेला आहे. वादक व गीतकार कार्यक्रम ठिकाणी श्रीरामाचे गीत गाऊ लागल्याने याठिकाणी राममय वातावरण झाले आहे.