जळगाव, रावेर मतदारसंघाचा निकाल लागणार दुपारी चारपर्यंत !

by team

---Advertisement---

 

एका फेरीत १४ बुथची होणार मतमोजणी; ३६ कॅमेऱ्यांची राहणार नजर

जळगाव : लोकसभा निवडणुकीची

मतमोजणी दि. ४ जून रोजी होणार असून यात जळगाव व रावेर मतदारसंघ मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या २६ तर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या २४ मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. एका फेरीला किमान अर्धातास वेळ लागणार आहे. मतदानाचा कल सरासरी दुपारी चारपर्यंत स्पष्ट होणार आहे. तसेच मतमोजणी ठिकाणी ३६ कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या तयारीबाबतचा आढावा देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यावेळी

उपस्थित होते. एमआयडीसीतील एफसीआय गोडावूनमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठी लोकसभेतील तेरा विधानसभा मतदार संघनिहाय टेबल लावण्यात आले आहेत. सर्वांत जास्त फेऱ्या जळगाव शहर मतदारसंघात २६ तर जामनेर मतदारसंघात २४ फेऱ्या

मतमोजणीसाठी निरीक्षकांची नियुक्ती

होतील. एका विधानसभेसाठी १४ टेबलांवर मतमोजणी होईल. एका टेबलवर तीन अधिकारी (मतमोजणी सुपरवायझर, मायक्रो आब्जरवर, काउंटिंग सहायक) व एक शिपाई असतील.

पोस्टल, ईटीपीबीएसच्या मतदान पत्रिकेचे स्कॅनिंगसाठी जळगावला

मतमोजणीसाठी निरीक्षक म्हणून राहुल गुप्ता (जळगाव शहर, ग्रामीण, जामनेर, अमळनेर विधानसभा मतदारसंघ),

सीमाकुमारी उदयपुरी (एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा), पुष्पांजली दास (चोपडा, रावेर, भुसावळ), महेंदर पाल (जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिलेल्या मतदारसंघानुसार ते मतमोजणीचे निरीक्षण करतील.

लोकसभेसाठी सहा टेबल, रावेरसाठी चार टेबल असतील. त्याची मतमोजणी, होम व्होटिंगची मतमोजणी अगोदर होईल. मतमोजणीसाठी सुमारे तीन हजारांवर कर्मचारी असतील. मतमोजणी प्रक्रियेची सोमवार दि. ३ रोजी प्रत्यक्ष डमी चाचणी मतमोजणी ठिकाणी घेतली जाणार आहे.

असा राहणार मतमोजणी कार्यक्रम

* सकाळी ५ वाजता कर्मचाऱ्यांना टेबलचे वाटप.

* ६.३० वाजता उमेदवार व त्यांच्या एजंटला प्रवेश.

* ७ वाजता गेट उघडले जाणार.

* ७.४५ वाजता ईव्हीएम मशिनच्या

गोडाऊनचे गेट उघडले जाणार. • सकाळी ८ वाजता पोस्टल मतमोजणी सुरू.

* ८.३० ला ईव्हीएम मोजणी सुरू, • दर अर्धातासाने फेरीनिहाय

निकाल जाहीर होणार.

दोन दिवस मिरवणुका काढता येणार नाही

मतमोजणीच्या निकालानंतर उमेदवार अथवा समर्थकांना दोन दिवस विजयी मिरवणूक काढता येणार नाही. त्यासाठी तीन दिवसानंतर अटी-शर्थीने परवानगी दिली जाईल.

मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी सज्ज असलेली प्रशासकीय यंत्रणा.

पाचशेवर पोलिस बंदोबस्त तैनात

मतमोजणी प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था राहावी, यासाठी दोन ॐ अतिरिक्त पोलिस अधीक्षक, दोन डीवायएसपी, चार पोलिस निरीक्षक, २२ सहायक निरीक्षक, ३४१ पोलिस, ५१ महिला पोलिस २

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---