जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघात आज अखेर स्त्रिया , पुरुष आणि तृतीयपंथी यांची मतदार नोंदणी संख्या 19 लाख, 81 हजार 472 एवढी असून रावेर लोकसभा मतदार संघात 18 लाख 11 हजार 951 एवढी नोंद झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.
जळगावं लोकसभा मतदार संघात एकूण पुरुष मतदार नोंद 10 लाख 31 हजार 60 एवढी असून स्त्रियांची संख्या 9 लाख 50 हजार 329 एवढी आहे तर तृतीयपंथी एकूण 83 आहेत. अशी सर्व मिळून 19 लाख 81 हजार 472 एवढी नोंद आज अखेर पर्यंत आहे.
विधानसभा मतदार संघ निहाय संख्या खालील प्रमाणे आहे
जळगांव शहर विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 207019 स्त्रीयांची संख्या-188113, तृतीय पंथी संख्या 32 असे एकुण 395164 मतदार आहेत. जळगांव ग्रामीण विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 1,66330 स्त्रीयांची संख्या- 1,55302 तृतीय पंथी संख्या -03 असे एकुण 321635 मतदार आहेत.
अमळनेर (एससी) विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 155220 स्त्रीयांची संख्या-146010 तृतीय पंथी संख्या 3 असे एकुण 301233 मतदार आहेत.
एरंडोल विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 147479, स्त्रियांची संख्या 138322 तर तृतीय पंथी संख्या 10 असे एकुण 285811 मतदार आहेत.
चाळीसगांव विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या 189801, स्त्रीयांची संख्या- 169851 तृतीय पंथी संख्या -29 असे एकुण 359681 मतदार आहेत.
पाचोरा विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या 165211 स्त्रीयांची संख्या – 152731 तृतीय पंथी संख्या 6 असे एकुण 317948 मतदार आहेत.
रावेर लोकसभा मतदार संघात एकूण पुरुष मतदार नोंद 9 लाख 37 हजार 54 एवढी असून महिलांची संख्या 8 लाख 74 हजार 843 एवढी आहे तर तृतीयपंथी एकूण 54 आहेत. अशी सर्व मिळून 18 लाख 11 हजार 951 एवढी नोंद आज अखेर पर्यंत आहे.
विधानसभा मतदार संघ निहाय संख्या खालील प्रमाणे आहे
चोपडा (एसटी) विधानसभा मतदार संघामध्ये मध्ये पुरुष संख्या 164152, स्त्रीयांची संख्या- 156584, तृतीय पंथी संख्या 02 असे एकुण 320738 मतदार आहेत.
रावेर विधानसभा मतदार संघात एकुण पुरुष संख्या 153883, स्त्रीयांची संख्या- 144447, तृतीय पंथी संख्या-02 असे एकुण 298332 मतदार आहेत.
भुसावळ (एससी) विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या-154058 स्त्रीयांची संख्या-143539 तृतीय पंथी संख्या 37 असे एकुण 297634 मतदार आहेत.
जामनेर विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या1,66,837, स्त्रीयांची संख्या- 1,54,519, तृतीय पंथी संख्या -00 असे एकुण 321356 मतदार आहेत.
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या 151628, स्त्रियांची संख्या 142683, तृतीय पंथी संख्या-07 असे एकुण 294318 मतदार आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुर विधानसभा क्षेत्र हे रावेर लोकसभा मतदार संघात येते तेथील पुरुष संख्या 146496 स्त्रीयांची संख्या- 133071, तृतीय पंथी संख्या 6 असे एकुण 279573 मतदार आहेत.
असे एकत्रित दोन्ही लोकसभा मतदार संघातील एकुण पुरुष संख्या 1968114, एकुण स्त्रीयांची संख्या-1825172, एकुण तृतीय पंथी संख्या 137 असे एकुण 3793423 मतदार आहेत.