जळगाव : भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हिएशन यांनी फ्लाय नाईन्टी वन कंपनीला आजच सर्व परवानग्या पुर्ण झाल्याने डीजीसीएकडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र पत्र देण्यात आले असून लवकरच फ्लाय ९१ कंपनीचे विमान जळगाव विमानतळावरून आकाशात झेपावणार असल्याची माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी दिली.
गेल्या पंधरवड्यात खासदार उन्मेश पाटील यांनी डीजीसीए चेअरमन विक्रम दत्त, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन जळगाव येथून पुणे, हैदराबाद व गोवा प्रवाशी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात सात्तत्याने पाठपुरावा केला होता.आजअखेर या सर्व परवानग्याचे प्रमाणपत्र कंपनीला देण्यात आले असून, पुन्हा एकदा जळगाव विमानतळावरून विमान प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
दळणवळणास मिळणार गती
खासदार उन्मेश पाटील यांनी सातत्याने जळगाव विमानतळाच्या या विमानतळावरून ळावरून नाईट लैंडिंग ते वैमानिक प्रशिक्षण केंद्र या सुविधांच्या माध्यमातून जळगाव विमानतळ हे देशाच्या विमानतळाच्या यादीमध्ये अग्रस्थानी असणार आहे. आज दीर्घ प्रतीक्षेनंतर फ्लाय ९१ एअर लाईनला डीजीसीएकडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळाले. त्यानुसार लवकरच जळगाव विमानतळावरून विमान सेवा मिळणार आहे.