जळगाव : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असताना महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर जळगाव शहरासह परिसरात आज पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. असे असले तरी दमदार पावसाची अजूनही प्रतिक्षा कायम आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी यंदाच्या हंगामातील पावसाने हजेरी लावली आहे. जून महिना संपत आला तरी देखील अद्यापही पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु आज झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यामुळे काही ठिकाणी शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे.
उकाड्यापासून दिलासा
पाऊस येत नसल्याने नागरीक उकाड्याने हैरान झाले होते. मात्र दोन दिवस ढगाळ वातावरण होते. यात आज झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.