जळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे वृक्ष रोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. आर. पवार, जिल्हा न्यायाधीश जे. जे. मोहिते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एस. पी. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश एस. एस. परदेशी आणि जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा उपस्थित होते.
तसेच लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक कादिर शेख, उप मुख्य लोक अभिरक्षक मंजुळा कचरुलाल मुंदडा, तसेच सहा. लोक अभिरक्षक सागर जोशी, हर्षल शर्मा, अभिजीत रंधे, शिल्पा रावेरकर, रोहिणी विष्णू थोरात (राऊंड फाॅरेस्ट ऑफिसर सोशल फाॅरेस्ट्री, जैन इर्रीगेशन सिस्टिम लि चे राजेंद्र राणे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी मदन लाठी , क्लीन ग्रुप जळगावचे विशाल पाटील, रवी नेटके, डॉ. महेंद्र काबरा, आदित्य तोतला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात झाडे लावून करण्यात आली. कार्यक्रमाचे वेळेस जिल्हा विधी प्राधिकरणाचे समांतर विधी सहायक शिलांबरी जामदाळे व तेजस जामदाळे यांनी झाडे नसतील तर पर्यावरणाचे काय होईल तसेच वृक्ष तोड यावर पंथनाट्य सादर केले. यावेळी पर्यावरण रक्षणाची सर्वांनी शपथ घेतली. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक सुभाष पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कनिष्ट लिपिक आर. के. पाटील,प्रमोद ठाकरे, गणेश निंबोळकर, हर्षल नेरपागरे, राहुल माकोडे, जयश्री पाटील, प्रकाश काजळे, रणबीर राणा, राहुल साळुंखे, तेजस्विनी आरखे, लीना पाटील, निलेश महेंद्र, यांनी काम पहिले.