मुंबई: देशांतर्गत शेअर बाजारासाठी २०२३ हे वर्ष लक्षणीय आणि स्मरणीय ठरले आहे.जागतिक बाजारपेठेचा विचार करता भारतीय शेअर बाजाराने हाँगकाँगला पिछाडीवर टाकत सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. असे वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्स्चेंजच्या ताज्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.यावर्षी बीएसई निर्देशांक आणि एनएसईच्या निफ्टीने अनेक विक्रम आपल्या नावावर निफ्टीमध्ये १६ टक्क्यांनी वाट निफ्टी या वर्षी १६ टक्क्यांनी वाढला आहे. सलग आठव्या वर्षी नफ्याचा आलेख वाढताच आहे. हाँगकाँगचा बेंचमार्क निर्देशांक हँग सेंग इंडेक्स या वर्षी १७ टक्क्यांनी घसरला आहे. अशा स्थितीत भारताने यावर्षी एका क्रमवारीत पुढे जाण्यात यश मिळविले आहे.
देशांतर्गत गुंतवणूकदारांचा पाठिंबा आशियाई क्षेत्रांच्या भाडवली बाजारपेठांचा विचार करता भारतीय बाजारपेठेला देशांतर्गत गुंतवणूकदारांचा पाठिंबा मिळाल्याच दिसले. चलनवाढ आणि जीडीपीच्या सकारात्मक आकडेवारीसह रोखे उत्पन्नात घट यासारख्या घटकांमुळे बाजार तेजीत दिसत आहे. याशिवाय नुकत्याच पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हे आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्थिर सरकारचे संकेत देत असल्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसत असल्याचे मानले जात आहे.केले आहेत. २०२३ वर्ष निरोप घेताना भारतीय शेअर बाजाराने हाँगकाँगला मागे टाकत बाजारमूल्याच्या बाबतीत जगातील सातव्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत भारताने आता आणखी एक पायरी वर केली आहे. काही दिवसांपूर्वीच बीएसईचे एकूणबाजारमूल्य प्रथमच चार ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले. निर्देशांकाने ७० हजारांचा आकडाही पार केला. त्याचवेळी निफ्टीनेही २१.०३१ चा उच्चांक गाठला. एनएसईचे बाजारमूल्य ३.९८९ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे, तर हाँगकाँगचे बाजारमूल्य ३.९८४ ट्रिलियन डॉलर्सवर आहे.