Lok Sabha Election 2024 : राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीत जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, दुसरीकडे उद्धव ठाकरेयांनी केलेल्या एका घोषणेवरून आघाडीत बिघाडी होते की काय अशी चर्चा पाहायला मिळत आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांतून उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केल्याबद्दल संजय निरुपम यांनी प्रश्न उपस्थित केला आङे. संजय निरुपम म्हणाले की, शिवसेनेने उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे, तर जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. असे असतांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नागरदास रोड अंधेरी येथील शाखेत येतात आणि अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर करतात. ज्या जागेवर अजून निर्णय झाला नाही, ती जागा जाहीर केली जाते. त्यामुळे महाविकास आघाडी धर्म पाळला जात नाही, असे निरुपम म्हणाले.
पुढे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारावरही त्यांनी अनेक आरोप केले. संजय निरुपम म्हणाले, काँग्रेसची अवहेलना करण्यासाठी जाणीवपूर्वक असे कृत्य केले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित केलेला उमेदवार कोण? तो खिचडी घोटाळ्याचा घोटाळेबाज आहे. त्याने खिचडी पुरवठादाराकडून चेकद्वारे लाच घेतली आहे.