रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने काम हाती घेतले आहे व जलदगतीने काम पूर्ण देखील करत आहे. देशातील सर्व शहरे सेमी हायस्पीड ट्रेनने जोडल्यानंतर आता अमृत भारत ट्रेन चालवण्याची तयारी सुरू आहे,शनिवारी म्हणजेच ३० डिसेंबर ला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतून 7 ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. त्यापैकी 2 गाड्या अमृत भारत असतील.
पहिली ‘अमृत भारत ट्रेन’ अयोध्या ते दरभंगा दरम्यान सुरू केली जाईल.तर दुसरी हावडा ते बेंगळुरू सुरु केली जाणार आहे. ही पूर्ण ट्रेन भारतात बनवली गेली आहे. एक अमृत भारत ट्रेन दिल्ली ते दरभंगा आणि दुसरी हावडा ते बेंगळुरू. विशेष म्हणजे दरभंगाला जाणारी ट्रेन अयोध्येतून सुरू होणार आहे. ती दिल्लीहून दरभंगामार्गे अयोध्येला जाईल.30 डिसेंबर रोजी ही ट्रेन विशेष धावणार आहे. त्या दिवशी ही ट्रेन अयोध्येहून दरभंगाला जाईल. त्याची पहिली रन 30 डिसेंबर रोजी होईल, जी अयोध्या ते दरभंगा असेल.
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही ट्रेन नियमित धावणार आहे. या ट्रेनचा कमाल वेग ताशी 130 किलोमीटर आहे. ही राजधानी एक्सप्रेसच्या बरोबरीची आहे. या ट्रेनमध्ये एकूण 22 डबे बसवण्यात येणार आहेत. हायटेक टॉयलेट, मोबाईल चार्जिंग, ऑटोमॅटिक दरवाजे आणि अत्याधुनिक खिडक्या आणि दरवाजे ही त्याची खासियत आहे.