---Advertisement---

जाणून घ्या, काय आहेत रेन बाथ’ चे फायदे

by team
---Advertisement---

मुंबई,

benefits of ‘rain bath’  सध्या उत्तर भारतातील सर्वच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरांमध्ये पाणी तुंबल्याने सखल भागात राहणाऱ्या नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. असं म्हणतात की पहिल्या पाऊसात ओल झाल्याने अंगातले आजार बरे होतात.  प्रत्येक व्यक्तीने कधी ना कधी पावसात आंघोळीचा आनंद घेतला असेलच. काही लोक पावसात आंघोळीला अनेक आजारांशी जोडतात. दुसरीकडे, काही लोक पावसात आंघोळ करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानतात. ‘ पावसामुळे काहींना सर्दी आणि ताप येऊ शकतो. मात्र, याशिवाय त्याचा शरीरावर विशेष परिणाम होत नाही.

 पावसात अंघोळ केल्याने शरीराच्या समस्या होतात दूर.

पावसाच्या पाण्यात अशी अनेक खनिजे आढळतात, जी मानवांसाठी फायदेशीर ठरतात. यामध्ये अल्कलाइन पीएफ असते, जे केस मजबूत करण्याचे काम करते. यात कोणतेही जड धातू देखील नसतात. त्यामुळे केसांचा कोरडेपणाही दूर होतो.

पाऊस केवळ केसांसाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर मानला जातो. यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहते आणि शरीरावर चिकटलेली घाण सहज निघते.
पावसात आंघोळ केल्याने शरीरात सेरोटोनिन आणि एंडॉर्फिन नावाचे हार्मोन्स बाहेर पडतात. हे हार्मोन्स तणाव आणि चिंता दूर करून तुम्हाला आनंदी बनवण्याचे काम करतात.
जर तुम्हाला हार्मोनल असंतुलनाची समस्या असेल तर पावसात आंघोळ करणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे.तसेच पावसात अंघोळ करण्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहत असे म्हंटल जात ज्याचे मन निरोगी त्याचे शरीर निरोगी 

पावसाळ्यात या गोष्टींची काळजी घ्या. 
1. मोसमातील पहिल्या किंवा दुसऱ्या पावसात आंघोळ करणे टाळावे. कारण ते खूप प्रदूषित आहे. यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
2. पावसात जास्त वेळ अंघोळ करण्याची चूक करू नका. कारण आजारी पडण्याचा धोका असू शकतो.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment