मुंबई : एका पत्रकार परिषदेत बोलतांना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्लाबोल केलाय. आव्हाड म्हणाले, “मी राजकीय वय बघून स्टेटमेंट देत असतो. अमोल मिटकरींचे राजकीय वय अजून तीन वर्षे देखील नाही. अजून तो रांगणारा बालक आहे. 5000 रुपयांवर स्वतःचं ज्ञान विकणारा माणूस होता. ते अजित दादांना आवडलं, चांगला पाठांतर करतो. माझी किती वर्षे राजकारणात गेली ते पवार साहेबांनी सागितलंय ”
जितेंद्र आव्हाड म्हणाले, माझी किती वर्षे राजकारणात गेली ते पवार साहेबांनी सागितलंय. माझ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, तो राष्ट्रीय पातळीवरून काम करत आणलेला माणूस आहे .त्याला कुठे काय बोलायचं त्याला मार्गदर्शन करू नका. तो जे बोलतो ती पक्षाची भूमिका असते.त्यामुळे माझं राजकीय वय शरद पवारांनीच सांगितलं आहे. असही आव्हाड म्हणाले..