जिनपिंग यांना धक्का देत ; भारतीय अर्थव्यवस्थेची गगनभरारी , चीनपेक्षा दुप्पट भारताचा विकास दर

लोकसभेच्या निकालेच पडघम वाजत आहे. अवघ्या तीन दिवसांवर कोणाचे सरकार येणार हा फैसला होईल. पण त्या आधी आर्थिक मोर्च्यावर मोठी अपडेट समोर आली आहे. जानेवारी-मार्च २०२४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्क्यांवर पोहचली आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या सात टप्प्यातील मतदान आज, १ जून रोजी होत आहे. त्याचवेळी भारतीय अर्थव्यवस्थेच्या दमदार कामगिरीने भारतीयांना सुखद धक्का दिला. निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी येईल. त्यापूर्वी ही आनंदवार्ता येऊन धडकली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत म्हणजे जानेवारी- मार्च २०२४ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनात,भारताच्या अर्थव्यवस्थाने मोठी उडी घेतली. जीडीपी वाढ ७.८ टक्के राहिली. या दमदार कामगिरीने भारताने चीनची झोप उडवली आहे. चीनपेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेची घौडदौड चांगली झाल्याचे दिसून येते. पण अजून चीन इतकी अर्थव्यवस्था होण्यासाठी भारताला मोठी मेहनत करावी लागणार हे पण तितकेच खरे.

चीनपेक्षा दुप्पट कामगिरी

यंदाच्या आर्थिक वर्षात, जानेवारी- मार्च २०२४ या तिमाहीत जीडीपी वाढ ७.८ टक्के राहिली. गेल्या वर्षी या समान कालावधीतील तिमाहीत जीडीपी वाढ ६.१ टक्के इतकी होती. तर आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये जीडीपी वाढ ८.२ टक्के इतकी होती. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये चीनचा जीडीपी जवळपास ४.५ टक्क्यांचा जवळपास होता. चीनचा आर्थिक वृद्धी दर जानेवारी ते मार्च या तिमाहीत ५.३ टक्के इतका आहे.