जळगाव : महिला व निर्भीड व स्वावलंबी बनिवण्याच्या हेतूने मागील आठ वर्षांपासून जळगाव जिल्हा महिला असोसिएशन जागतिक महिला दिन साजरा करत आहे. यावर्षी जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात असोसिएशनतर्फे नृत्य स्पर्धे सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे उद्घाटन मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते तर खाद्य चौपटीचे उद्घाटन दीपाली पाटील, नंदनी यादव यांच्या हस्ते होईल अध्यक्षस्थानी तहसीलदार शीतल राजपूत असतील.
जागतिक महिला दिनानिमित्त दुपारी १ वाजेपासून सांयकाळी ७ वाजेपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात येतील. यात दुपारी १ वाजता दीपप्रज्वलन, प्रबोधनात्मक विषयांवर समूह नृत्य स्पर्धा होईल. यात प्रथम पुरस्कार २१०० रुपये, द्वितीय १५००, तृतीय ११०० आणि उत्तेजनार्थ ७०० रुपयांचे बक्षीस दिले जाईल. अधिक माहितीसाठी चंद्रकला परदेशी, डॉ. देवानंद साखला यांच्याशी संपर्क साधवा. ‘मै औरत हू’ ही लघुनाटीका सादर केली जाईल. नंदिनी जाधव यांच्यासोबत संवाद साधला जाईल. यासह इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी व्हावेअसे आवाहन असोसिएशन अध्यक्षराजकुमारी बाल्दी, उपाध्यक्ष मंगला नगरकर सचिव जोत्सना व्हराटे,कोषाध्यक्ष मीनाक्षी वाणी केले आहे