जिल्ह्यात दहावी उत्तीर्णांत मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक ; ९५.१५ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात जळगाव जिल्हयात मुलींनी अव्वल स्थान पटकविले आहे. जळगाव जिल्ह्यातून ५६ हजार १४४ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. यापैकी  ५५ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यात ५३ हजार २८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.  जिल्ह्याची उत्तीर्णांची टक्केवारी ९४.८८ आहे.

जळगाव जिल्ह्यातून  ३२ हजार ३९६ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. यापैकी ३२ हजार ३१३ विद्यार्थांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यापैकी ३० हजार ८८ विद्यार्थी म्हणजेच ९३.४० टक्के विद्यार्थी पास झालेत. तर जिल्ह्यातून २४ हजार ७४७ विद्यार्थिनींनी नोंदणी केली होती. यापैकी २४ हजार ६६२ विद्यार्थींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यापैकी २३ हजार ६६९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्यात. विद्यार्थनीची उत्तीर्णांची टक्केवारी ही ९५.१५ टक्के आहे.

 

येथे पाहू शकता ऑनलाईन निकाल :