---Advertisement---

जि.प.च्या शाळेत प्रवेश! पालकांना घरपट्टीसह पाणीपट्टी माफ, ‘या’ ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

---Advertisement---

आजच्या शैक्षणिक स्पर्धात्मक युगात जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांचे अस्तित्व टिकून रहावे, यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायती अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश घेतलेल्या पालकांना ग्रामपंचायत कर, घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातील मोंढाळे तर धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील मालपूर या स्थानिक स्तरावर या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली असत्याचे ग्रामपंचायत प्रशासन व गटशिक्षणाधिकारी यांनी म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषद प्रशासनाच्या मराठी सेमीइंग्लिश माध्यमाच्या सुमारे एक हजार ८३५ प्राथमिक मराठी तसेच उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत.

यात एक मोबाइल डिजिटल आहेत. बऱ्याच ठिकाणी शिक्षक, मुख्याध्यापकांची संख्या पुरेशा प्रमाणात आहे. तर काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात असून विद्यार्थी पटसंख्या बऱ्यापैकी आहे. परंतु काही ठिकाणी खाजगी, सेमीइंग्रजी मराठी शाळांचे प्रमाण बरेच आहे. आपत्या मुलाने इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घ्यावे, असे प्रत्येक पालकाला वाटते. त्यामुळे स्पर्धात्मकरीत्या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे. पर्यायाने शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या टिकवण्यासह जिल्हा परिषदेच्या शाळांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला आहे .

शिंदखेडा – आजच्या शैक्षणिक स्पर्धात्मक युगात जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांचे अस्तित्व टिकून रहावे, यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीअंतर्गत जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या वा प्रवेश घेतलेल्या पात्यांच्या पालकांना ग्रामपंचायत कर, घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत गावकऱ्यांतर्फे घेण्यात आला. मालपूर ग्रामपंचायतीतर्फे ग्राम स्थांना हा निर्णय कळविण्यात आला आहे. मालपूर येथे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांचे प्रवेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घेतले तर अशा ग्रामस्थांची घरपट्टी व पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडून माफ केली जाईल, अशी सूचनाच मालपूर

ग्रामपंचायतीने कार्यालयाच्या बाहेर लावली आहे. वाढत्या शैक्षणिक स्पर्धे च्या युगात जिल्हा परिषद शाळेचे भवितव्य टिकवून ठेवणे आणि ग्राम स्थांमध्ये जिल्हा परिषद शाळांबाबत आस्था निर्माण होऊन जाणीव निर्माण करणे या उद्देशाने ग्रामस्थांनी हे स्तुत्य पाऊल उचलले असत्याचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष, धुळे यांनी सांगितले. चंद्रजित पाटील, ग्रामपंचायत गटनेते तथा संचालक साक्री तालुका शेतकी संघ, नैनेश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामसेवक सुशांत सोनवणे, माजी पोलीस पाटील भिकनराव सोनवणे, उत्तमराव सोनवणे, रवींद्र बोरसे, झिपरू बोरसे, अशोक सोनवणे, सुहास सोनवणे, मनोहर भामरे, माजी सरपंच सचिन सोनवणे, प्रमोद सोनवणे, माजी उपसरपंच शीलवंत पाटील, माजी उपसरपंच वैभव सोनवणे, किशोर काकुस्ते, भूषण पाटील, विशाल सोनवणे, नितीन सोनवणे, धीरज सोनवणे, भूषण भामरे आदी ग्राम स्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

  • सरकारी शाळांचे भवितव्य टिकविण्यासाठी आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ निर्माण करण्यासाठी, हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. या निर्णयाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अधिक बळकट होऊन ग्रामस्थांमध्ये जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी, सकारात्मक वातावरण निर्माण होणार असल्याचे मत मालपूर ग्रामपंचायत सदस्या भारतीबाई भीमराव भामरे यांनी व्यक्त केले आहे

ग्रामपंचायत मोंढाळेचा ऐतिहासिक निर्णय

भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोंढाळे येथे इयत्ता पहिलीच्या सीबीएससी पॅटर्न वर्गात मुलाचा प्रवेश घेतल्यास पालकाच्या एका घराची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना करमाफी या उपक्रमास अन्य ठिकाणी प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे.
किशोर वायकोळे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, भुसावळ.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment