जून महिन्यात शेअर बाजार राहणार सलग तीन दिवस बंद;जाणून घ्या कारण काय..

xr:d:DAFfBW8HCLE:57,j:44521743194,t:23040313

मुंबई : अनेकजण शेअर बाजारात पैसे गुंतवणून भरपूर पैसे कमवातात. आठवड्यात एकूण पाच दिवस शेअर दिवस चालू असतो. या पाच दिवसांत कशा प्रकारे पैसे गुंतवले पाहिजेत, त्यासाठी कोणते नियोजन आखले पाहिजे, याचा विचार गुंतवणूकदार आधीपासूनच करत असतात. उद्यापासून (१ जून) जून महिना चालू होत आहे. अनेक गुंतवणूकदारांनी नव्या महिन्यासाठी आपली स्ट्रॅटेजी आखली असेल. दरम्यान, याच जून महिन्यात सलग तीन दिवस शेअर बाजार बंद असणार आहे. या तिन्ही दिवसांत गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी किंवा विक्री करता येणार नाहीत.

सलग तीन दिवस शेअर बाजार बंद
मुंबई शेअर बाजाराच्या संकेतस्थळावर शेअर बाजाराला किती दिवस सुट्ट्या असतील, याची माहिती दिलेली आहे. शनिवार आणि रविवार असल्यामुळे १ आणि २ जून रोजी शेअर बाजार बंद असणार आहे. यासह आगामी १५, १६, १७ जून रोजीदेखील शेअर बाजार बंद असणार आहे. त्यामुळे या सुट्ट्या चालू होण्याआधीच गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी किंवा विक्री करून ठेवावे लागणार आहेत. १७ जूनपासून चालू होणाऱ्या भांवडवली बाजारात पाच ऐवजी फक्त चार दिवसच शेअर बाजार चालू असणार आहे.

आगामी महिन्यांत शेअर बाजार किती दिवस बंद असणार?
जून महिन्यानंतर २०२४ साली जुलै, ऑगस्ट आणि ऑक्टोबर १-१ दिवस शेअर बाजार बंद असेल. नोव्हेंबर महिन्यात दोन दिवसांसाठी शेअर बाजार बंद असेल. डिसेंबर महिन्यातही आठवडी सुट्ट्यांव्यतिरिक्त एक दिवस शेअर बाजार बंद असेल.

चार जून रोजी निकाल, शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडणार
येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीचे एक्झिट पोल येत्या १ जून रोजी येतील. एक्झिट पोल येताच देशात कोणाचे सरकार येणार, या बाबाबत अनेक अंदाज बांधले जातील. त्याचाच थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर होण्याची शक्यता आहे. देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता पुन्हा आल्यास काय होणार? यावेळी विरोधकांनी बाजी मारल्यावर शेअर बाजार पडणार का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. याच कारणामुळे सध्या गुंतवणूकदार सावध पवित्र्यात आहेत.

सध्या शेअर बाजारात अस्थिरता
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अस्थिरता जाणवत आहेत. कधी एखादा शेअर चांलगी मुसंडी मारताना दिसतोय. तर एखादा शेअर कोसळताना दिसतोय. केंद्रात येणाऱ्या सरकारबाबतही अनिश्चितता असल्यामुळे गुंतवणूकदार हात राखूनच पैसे गुंतवत आहेत. त्यामुळे आता येत्या चार जून रोजीच्या निकालावरच शेअर बाजाराची स्थिती ठरणार आहे.

सेन्सेक्स, निफ्टीची स्थिती काय?
दरम्यान, आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सत्राच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशाक सकारात्मक स्थितीत दिसले. सध्या निफ्टी निर्देशांक २२५२२ अंकांवर आहे. तर मुंबई शेअर बाजार ७४०२९.०२ अंकांवर आहे. आज दिवसाअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक पंचाहत्तर हजारांच्या पुढे जाणार का? तसेच राष्ट्रीय शेअर बाजारही २३ हजारांचा आकडा गाठणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.