लखनौ : ज्ञानवापी मशीद परिसरातील सर्वच बंद तळघरांचे सर्वेक्षण करण्याचा निर्देश भारतीय पुरातत्त्व विभागाला द्यावा, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर १५ फेब्रुवारी रोजी सुनावणी केली जाईल, असे वाराणसी न्यायालयाने सांगितले. परिसराच्या तळात गुप्त तळघरे आहेत आणि ज्ञानवापी मशिदीचे संपूर्णसत्य उघड करण्यासाठी त्यांचे सर्वेक्षणकरणे आवश्यक आहे.
ज्याचा हिंदूंनी दावा केला होता की, ज्ञानवापी मशीद पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मंदिराच्या अवशेषांवर बांधली गेली होती. प्रभारी जिल्हा न्यायाधीश अनिलकुमार यांनी याचिकेवरील सुनावणीची पुढील तारीख १५ फेब्रुवारी निश्चित केली आहे, असे हिंदू बाजूचे वकील मदन म ोहन यादव यांनी सांगितले. ज्ञानवापी संकुलात आठ तळघरेआहेत, ज्यांचे यापूर्वी सर्वेक्षण झाले नाही, असे त्यांनी राखी सिंह यांनी दाखल केलेल्या याचकेची माहिती देताना सांगितले. १९९१ च्या एका अन्य प्रकरणात उर्वरित सर्वेक्षण करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.