अमळनेर : शहरातील शाळा – कॉलेज व क्लासेसच्या बाहेर टारगट – विकृत – शाळाबाह्य मुलांच्या वाढलेल्या टवाळखोरीमुळे विद्यार्थीनीच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे या भागात पोलिसांची गस्त वाढवली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आली. याबाबत पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांना यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्याम पाटील, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.बी. एस. पाटील, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, प्रा.अशोक पवार, अक्षय चव्हाण, आरती पाटील, धनश्री चव्हाण, वसुंधरा लांडगे, गिताली बेहरे, उर्वशी पाटील, आशुतोष पाटील, राहुल बिऱ्हाडे, बापूराव पाटील, दर्पण वाघ, शुभम पवार, देव गोसावी,
यश हापसे, अजिंक्य चीखलोदकर, सोहम शिंदे, राहुल पाटील, उज्वल मोरे, निलेश पाटील, संदीप पाटील हे उपस्थित होते.