टायगर श्रॉफच्या ‘गणपत’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

गेल्या अनेक दिवसांपासून टायगर श्रॉफ स्टारर ‘गणपत या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.’गणपत’ चित्रपटातील स्टारकास्टचे फर्स्ट लूक पोस्टरही समोर आले आहे. दरम्यान, टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन यांच्या ‘गणपत’ या चित्रपटाचा धमाकेदार टीझर शुक्रवारी रिलीज झाला आहे. रिलीज झाल्यानंतर ‘गणपत’चा हा टीझर सोशल मीडियावर चाहत्यांची पहिली पसंती ठरला आहे.

दिग्दर्शक विकास बहल यांची पुढची ऑफर म्हणजे ‘गणपत’. या चित्रपटाचा टीझर निर्मात्यांनी आज म्हणजेच २९ सप्टेंबर रोजी रिलीज केला आहे. पूजा एन्टरटेन्मेंट बॅनरखाली गणपतचा टीझर पाहून तुम्हाला अकॅशन आणि थ्रिलचा वेगळा अनुभव मिळेल. चित्रपटाच्या या टीझरमध्ये टायगर श्रॉफ चित्रपटात बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहितीही मिळते. टायगर श्रॉफचा गणपत पुढील महिन्यात 20 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.