---Advertisement---

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आयुष्य संपवलं

by team
---Advertisement---

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा वय २० हिने गळफास लावून आत्महत्या केली आहे. सूत्रानुसार, तुनिषाने चहाच्या ब्रेक दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिस निरीक्षक कैलाश बर्वे यांनी सांगितले, आत्महत्येची माहिती मिळाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मा 20 वर्षांची होती. ती प्रसिद्ध टीव्ही सीरियल अलीबाबाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. शूटिंगसाठी ती सेटवर पोहोचली होती. त्याचवेळी चहाच्या ब्रेकच्या वेळी टॉयलेटमध्ये गेले. जिथे त्याने गळफास लावून घेतला. तुनिषा शर्माने आपल्या करिअरची सुरुवात भारत का वीर पुत्र : महाराणा प्रताप या चित्रपटातून केली होती. तिने अनेक शोमध्ये काम केले आहे. 

दरम्यान, तुनिषा शर्माने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून कळू शकले नाहीये. पोलिसांनी तपासाला सुरूवात केल्याचे देखील सांगितले जात आहे. तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झालीये.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment