जळगाव : नेहरू चौक ते टॉवर चौक या रस्त्यावरील दुचाकीसह चार चाकी वाहनांना पार्किंगची शिस्त लागावी यासाठी महापालिका टोईग व्हॅनसाठीची निविदा काढणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. विद्या। गायकवाड यांनी दिली. नेहरू चौक ते टॉवर चौक हा रस्ता अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. यावर विक्रेत्याच्या अतिक्रमणासह बेशिस्त पार्किंग केले जात आहे. यास शिस्त लागावी म्हणून रस्ता दुभाजकापासून १२ मिटरचे रस्ते मोजून तेथे पिवळे पट्टे आखण्यात आले आहे.
या पिवळ्या पट्ट्यांच्या आत वाहने लावली तर त्यावर मनपा व वाहतुक पोलीसांतर्फे कारवाई करण्यात येत आहे.गल्ली बोळात करणार पार्किंगचे नियोजन या मुख्य रस्त्यालगत २०० ते ३०० गल्लीबोळ आहेत. यात कचरा टाकण् यात येत असतो. त्याचा वापर जर पार्किंगसाठी कसा करता येईल याबाबत मनपा विचार करत आहेत. यानुसार दुचाकी व चारचाकी वाहने या ठिकाणी पार्क करता येतील. यामुळे १२ मिटर रस्ते हे पूर्णपणे वाहतूकीसाठी मोकळे असतील.
टोईंग वाहनासाठी निविदा दुचाकी वाहने मनपाच्या ट्रॅक्टरमध्ये टाकून नेण्यात येतील. तर चार चाकी वाहने ही टोईंग करून वाहतूक पोलीस शाखेत नेण्यात येणार आहेत. त्यासाठी टोईग वाहनांसाठी निविदा काढण्यात येणार आहे.कारवाई पुन्हा होणार सुरू गेल्या दोन आठवड्यापासून या रस्त्यावरील पिवळ्या रेषेआतील वाहनांवर कारवाई करण्यात येत होती. परंतु मराठा आरक्षणासाठी कर्मचारी गेल्याने ही कारवाई थंडावली होती. आता ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी या रस्त्यावर वाहने लावतांना जपूनच लावावी.