एरंडोल : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १७ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एरंडोल कासोदा रस्त्यावर घडली. अरुण काळू मराठे (३९, रा. वेल्हाणे, ता.जि. धुळे) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल रघुनाथ पाटील व अरुण कळू मराठे हे दोघे दुचाकी (क्र. एम एच १८ बी डब्ल्यू १८३६) ने अरुण मराठे याच्या नातेवाईकाच्या लग्नात जळगाव येथे गेले होते. दरम्यान, तेथून दीड वाजेच्या सुमारास परतत बालवाडी तालुका भडगाव येथील सासरवाडीस जात असताना खडके खुर्द गावापासून एक किलोमीटर अंतरावर वळणावर भडगाव कडून येणाऱ्या एम एच १८ बीजी ३२४० क्रमांकाच्या ट्रकने कट मारला. यात मागे बसलेला अरुण मराठे हा रस्त्यावरून खाली फेकला गेला. ट्रकचे मागीलचाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.
दुचाकीस्वार अनिल पाटील गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. एरंडोल पोलीस स्टेशनचे पीएसआय विकास देशमुख किरण पाटील हे पुढील तपास करीत आहेत