---Advertisement---

ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक : महाराष्ट्र एक्स्प्रेस आजपासून दोन दिवस पुण्यापर्यंत धावणार

by team
---Advertisement---

भुसावळ : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे आणि मीरज विभागातील जरंडेश्वर आणि सातारा स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री- नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक ३१ रोजी घेण्यात येत असल्याने गाडी क्रमांक ११०४० गोंदिया- कोल्हापूर एक्सप्रेस ३० रोजी पुणे स्थानक येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली असून ही गाडी कोल्हापूरपर्यंत धावणार नाही तर गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर -गोंदिया एक्सप्रेस प्रवास ३१ रोजी पुणे स्थानकावरून आपल्या नियोजित वेळेत सुटेल. ही गाडी कोल्हापूर ते पुणे दरम्यान रद्द राहणार आहे. गाडी क्रमांक २२६८६ चंडीगढ-यशवंतपूर एक्सप्रेस ३० रोजी मनमाड, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, दौंड, कुडूवाडी, पंढरपूर, मीरज मार्गे वळवण्यात येईल. ही गाडी पुणे ते मीरज दरम्यान रद्द राहणार आहे. प्रवाशांनी दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment