ट्रेडींग इन्व्हेसमेंटचे आमिष; जळगावात डॉक्टराला घातला साडेसात लाखाचा गंडा

जळगाव : ट्रेडींग इन्व्हेसमेंट करुन प्रचंड नफा मिळवून देतो,अशी थाफ देत सायबर ठगांनी शहरात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टराला 7 लाख 47 हजार 737 रुपये ऑनलाईन उकळले. याप्रकरणी सोमवार 5 रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

डॉ. चंदर उदासी हे पेशाने डॉक्टर असून ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. 28 डिसेंबर 2023 ते शनिवार 3 जानेवारी 2024 या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर लक्क्षीत तसेच समीर शर्मा या अनोळखींनी व्हॉटसॲप क्रमांकावरुन संपर्क साधला. जास्तीच्या फायद्यासाठी गुतंवणुक करण्याच्या बहाण्याने त्यांनी तक्रारदाराला विविध बॅंक खात्यावर ट्रेडींगच्या नावाखाली गुंतवणुक करण्यास सांगितले. ठगांनी त्यांच्याकडून 7 लाखाहून अधिक रक्कम ऑनलाईन स्विकारली. कोणताही मोबदला न देता खात्यातील रोकड सायबर गुन्हेगारांनी हडप केली. या प्रकरणी तपास पोनि शिल्पा पाटील हे करत आहेत.

दुप्पटीने पैसे कमविण्याचे स्वप्न दाखवितात ठग (चौकट)
दुप्पटीने पैसे कमविण्याचे स्वप्न सायबर गुन्हेगार नागरिकांना दाखवितात. आपणास यासाठी गृपमध्ये समावेश करत आहोत,असे सांगतात. तसेच यासाठी 1 हजार 300 किंवा 1 हजार 500 किंवा 1 हजार रुपये दिल्यानंतर आपणास परवाना मिळेल,अशी ग्राहकाला भुलवन करतात. गृप युझर्सकडून आपणास जास्तीचे पैसे आपल्या बँक खात्यात वर्ग होतात, असे अमिष दाखवितात.त्यानंतर वारंवार फोन करुन ग्राहकाला जाळयात ओढतात. गृपमध्ये अडकलेले पैसे काढण्यासाठी ग्राहक पुन्हा ठगांनी दिलेल्या अकाउंटवर पैसे पाठवतात. त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम वाढत जाते. मोबादला काहीच मिळत नाही.