काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे आज महाविकास आघाडीच्या बैठकीला गैरहजर असणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटातील १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर महाविकास आघाडीतच मिठाचा खडा पडला आहे. ठाकरेंच्या पहिल्या यादीतच सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर उमेदवारी दिल्याने काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी आघाडी धर्माचं पालन केलं नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी दिली.सांगलीच्या जागेवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मनभेद निर्माण झालेले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जागा परस्पर घोषित केल्यानं नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीच्या चर्चेत सांगली आणि भिवंडी ही जागा काँग्रेसला देण्यावर जवळपास एकमत झाले होते. असं असताना उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जागा चंद्रहार पाटील यांना काल घोषित केली. त्यामुळे नाना पटोले नाराज आहेत, असं बोललं जातंय.