ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी? ‘हे’ आहेत 17 उमेदवार

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपली पहिली यादी जाहीर केली आहे. ठाकरेंकडून तब्बल 17 उमेदवारांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १७ उमेदवारांची नावे आहेत. औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादी तयार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आज सकाळी नऊ वाजता उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.

वाचा उमेदवारांची संपूर्ण यादी
बुलढाणा- नरेंद्र खेडेकर,यवतमाळ-वाशिम- संजय देशमुख, मावळ- संजोग वाघेरे-पाटील, सांगली- चंद्रहार पाटील, हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर, संभाजीनगर- चंद्रकांत खैरे, धाराशिव- ओमराजे निंबाळकर, शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक- राजाभाऊ वाजे, रायगड- अनंत गीते, सिंधुदुर्ग-रत्नागिरी- विनायक राऊत, ठाणे- राजन विचारे, मुंबई-ईशान्य- संजय दिना पाटील, मुंबई-दक्षिण- अरविंद सावंत, मुंबई वायव्य- अमोल कीर्तीकर, परभणी- संजय जाधव