नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटालाच खरी शिवसेना घोषित करणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी ७ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या न्यायासना समोर याविषयीची सुनावणी घेतली जाणार आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अपात्रतेच्या याचिकेवरील १० जानेवारीच्या निकालाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने २२ जानेवारी रोजी महाराष्टाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील इतर आमदारांना नोटीस बजावली होती. उबाठा गटाने वारंवार न्यायालयात जोर दिला आहे की, महाराष्ट्रात पुढील विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी झाली पाहिजे.