---Advertisement---

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरे विरुद्ध ठाकरे असा रंगणार सामना .

by team
---Advertisement---

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे अनिल परब उमेदवारी दाखल करणार आहेत. तर, दुसरीकडे मनसेनं या जागेसाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढत होणरा आहे. राज ठाकरे यांच्या मनसेनं या जागेसाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला आह. ठाकरे गटाचे अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक लढवणार आहेत.

मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरे पक्षाचे उमेदवार ॲड अनिल परब उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेतेही यावेळी उपस्थित असतील. यानिमित्तानं ठाकरे पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. यासाठी ३ हजार शिवसैनिकही यावेळी हजर असणार आहेत.

दरम्यान मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. २००४, २०१२ आणि २०१८ असे ३ वेळा अनिल परब विधानपरिषदेचे शिवसेना आमदार राहिले आहेत. तर यंदा पहिल्यांदाच ते मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. विधान परिषदेच्या ४ जागांसाठी २६ जूनला सकाळी ८ ते संध्याकाळी ४ पर्यंत मतदान होणार आहे. तर १ जुलैला मतमोजणी आणि निकाल घोषित होणार आहे. चार जागांसाठी निवडणूक होत आहे, त्या मतदारसंघातील चार विधान परिषद आमदारांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपुष्टात येत आहे.

अनिल परब हे सोमवारी ३ जून रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह मुंबईतील शिवसेनेचे लोकसभा उमेदवार अरविंद सावंत, अनिल देसाई, अमोल कीर्तिकर, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, काँग्रेस लोकसभा उमेदवार भूषण पाटील तसेच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. अनिल परब हे कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे उमेदवारी दाखल करतील. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. उमेदवारी दाखल करतेवेळी तीन हजार शिवसैनिक, युवसैनिक तसेच पदवीधर मतदार यांची उपस्थिती राहणार आहे.

मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा विधान परिषदेच्या चार जागांसाठी ८ मे रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार म्हणून अनिल परब यांच्या नावाची घोषणा मागच्या आठवड्यात केली.मात्र महायुतीचा उमेदवार अजूनही घोषित झालेला नाही.

अनिल परब प्रथमच मुंबई पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढणार
२००४ तसेच २०१४ आणि २०१८ असे तीन वेळा अनिल परब हे विधानपरिषदेचे शिवसेना आमदार राहिलेले आहेत. यावेळी प्रथमच ते मुंबई पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघात यावेळी १ लाख १६ हजार ९२३ मतदार आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत तिढा पाहायला मिळतोय. मनसेनं या जागेसाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे. अभिजीत पानसे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. तसंच १२ वर्षांत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरजंन डावखरे यांनी काय काम केलं, असा सवालही पानसेंनी उपस्थित केला. सोबतच कोकणातला रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण वचननामा नाही तर रोजगारनामा जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment