डिझेल-पेट्रोल झाले स्वस्त; लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने दिली मोठी भेट

Petrol-Diesel Rate Cut: पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 2 रुपयांनी कमी केल्या आहेत, ज्या 15 मार्च 2024 पासून लागू होणार आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्याबद्दल पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2 रुपयांनी कमी करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की कोट्यवधी भारतीय त्यांचा परिवार आहेत. आपल्या या कुटुंबासाठी ते नेहमी धडपडत असतात. इतरांचे कल्याण आणि सुविधा हे त्यांचे ध्येय नेहमीच असते.

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर काय आहेत?
राजधानी दिल्लीत किमती कमी झाल्यानंतर पेट्रोल 94.72 रुपये प्रति लिटर, मुंबईत 104.21 रुपये, कोलकात्यात 103.94 रुपये आणि चेन्नईमध्ये 100.75 रुपये प्रति लिटरने उपलब्ध होणार आहे. डिझेलच्या नवीन किमतींवर नजर टाकली तर दिल्लीत एक लिटर डिझेल ८७.६२ रुपये, मुंबईत ९२.१५ रुपये, कोलकात्यात ९०.७६ रुपये आणि चेन्नईमध्ये ९२.३४ रुपये प्रति लिटर आहे.