डॉक्टरने केले हैवान सारखे कृत्य,एक इंजेक्शन दिलं आणि अवघ्या दोन मिनिटांत दोघांचा मृत्यू

crime news : लोकं देवा नंतर सगळ्यात जास्त विश्वास हा डॉक्टर वरती करतात, आणि काही डॉक्टर देखाली रुग्णाच्या सेवेसाठी कायम तत्पर असतात,अश्यातच एक घटना समोर आली आहे.डॉक्टररच  रुग्णाच्या मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.ही घटना नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोपर खैरणे मधील आकाशदीप रुग्णालयात एका तरूणाचा आणि एका महिलेचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त आणि शोकाकुल नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाशदीप रुग्णालयात एकाच वेळी दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये एक तरूण आणि एका महिलेचा समावेश आहे. दोघांनाही दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णांपैकी महिलेच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तर त्या तरूणावर मूळव्याधाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतर दोघांनाही एक इंजेक्शन देण्यात आले आणि काही वेळातच दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. थोड्या वेळापूर्वी आपले जे लोक नीट होते, ते अचानक गेल्याने नातेवाईकांच्या शोकाला पारावार उरला नाही.डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्यानेच दोघांचाही मृत्यू झाल्यांच आरोप नातेवाईकांनी केला असून संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरांवर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. त्यासाठी त्याने तातडीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.