Crime News: लोक डॉक्टरांना देव मानतात,पण काही डॉक्टर लोकांच्या जीवनाशी खेळतात, कमी खर्चाचे अमिश दाखून त्याना लुबाडले जाते.अश्यातच एक घटना समोर आली नवी दिल्ली मध्ये कोणतीही डिग्री नसताना दिल्लीतील डॉक्टर आणि त्याची रिसेप्शनिस्ट पत्नी ऑपरेशन करून घेत असल्याचेही समोर आले आहे,याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्यानुसार दिल्ली पोलिसांनी ग्रेटर कैलास येथून दोन डॉक्टर आणि दोन बनावट डॉक्टरांना अटक केली आहे. या क्लिनिकमध्ये शस्त्रक्रियेनंतर 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तेव्हा हे खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या चार आरोपींसोबत फरिदाबादमधील आणखी एका डॉक्टरचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
निष्काळजीपणामुळे अनेकांनी गमावला जीव
या लोकांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. एका 45 वर्षीय रुग्णाचा मृत् झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाल्यानंतर, हे प्रकरण संशयास्पद असल्याचे डॉक्टरांना वाटले. कारण वर्षभरापूर्वी, 2022 सालीही याच नर्सिंग होममध्ये एका महिलेचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला होता. प्रसूती वेदनांमुळे तिला या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी प्रसूती न करताच शस्त्रक्रिया केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी लावला होता.
सफदरजंग रुग्णालयातही केले काम
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. नीरज अग्रवाल यांचे हे अग्रवाल मेडिकल सेंटरआहे. नीरजने यापूर्वी सफदरजंग रुग्णालयात काम केले. काही वर्षे डॉक्टर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी हे नर्सिंग होम उघडले. ज्यामध्ये त्याची पत्नी पूजा अग्रवाल ही रिसेप्शनिस्ट आणि नर्सिंग स्टाफ म्हणून काम करत होती. तर महेंद्रने या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन टेक्निशियन म्हणूनही काम केले. या तिघांनी या रुग्णालयात सर्जन असलेल्या डॉ. जसप्रीत यांचे लेटरहेडही ठेवले होते.
त्या नर्सिंग होममध्ये कोणताही रुग्ण आलाय्वर त्याला थेट ऑपरेशन करण्यास सांगितलं जायचं. डॉक्टर जसप्रीत यांच्या नावाने प्रिस्क्रिप्शन तयार करण्यात यायचे तर, तंत्रज्ञ महेंद्र हा ऑपरेशन करायचा. या चौघांच्या फसवेगिरीमुळे आणि बेपर्वाईमुळे ऑपरेशननंतर अनेकांनी त्यांचा जीव गमावला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्याना 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.