डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्काराचे आज होणार वितरण

xr:d:DAFtd8oCXa8:2666,j:263885296971002183,t:24041307

जळगाव:  १२ एप्रिल येथील केशवस्मृती सेवा संस्था समूह व जळगाव जनता सहकारी बँक लि.तर्फे नवव्या डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्काराचे वितरण उद्या शनिवार, १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महाबळ रोडवरील छत्रपती संभाजी म हाराज नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावर्षी हा पुरस्कार यवतमाळ येथील दिलासा संस्था, पुणे पाबळ येथील विज्ञान आश्रम व मुंबई दादर येथील रामचंद्र प्रतिष्ठान यांना प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे वितरण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केशवस्मृती सेवा संस्था प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. अविनाश आचार्य यांच्या नावाने ‘डॉ. आचार्य अविनाशी पुरस्कार’ देण्यात येत असतो. या पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे. सेवा तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध घटकांच्या उत्थानाचे कार्य करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार देवून गौरविण्यात येते.

हिच परंपरा कायम ठेवत या वर्षाचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी १३ एप्रिल रोजी आयोजित केला आहे. सेवा समर्पणाच्या या अमृत कुंभात सहभागी व्हावे, असे आवाहन केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख डॉ. भरतदादा अमळकर व जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांनी केले आहे.

पुरस्काराचे स्वरूप
डॉ. आचार्य अविनाशी पुरस्कारात यावर्षी स्मृतीचिन्ह, मानपत्र व ३ लाख रुपये असे आहे.