डॉ.गावित व खा.डॉ. हिना गावित यांनी कन्यापूजन करून मातृशक्तीचा केला सन्मान

  नंदुरबार :  नवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत नंदुरबार शहरातील मोठा मारुती मंदिर  सभागृहात  109 कन्यांचे कन्यापूजन आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित व खासदार हिना गावित  यांनी जिल्ह्यात एकाचवेळी 109 कन्यापूजन करून मातृशक्तीचा सन्मान केला. हिंदू सेवा सहाय्य समिती आणि लताई आरोग्य धाम यांनी हा कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे डॉ. गावित यांनी  कौतुक करून भविष्यात असे सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

खासदार डॉ. हिना  गावित म्हणाल्या की, नवरात्रीत जसे आपण मातृशक्तीचा सन्मान करत आहोत त्याचप्रमाणे 365 दिवस ‌‘बेटी बचाओ बेटी पढाओ’साठी प्रयत्न करावा लागेल. आपल्या जिल्ह्यात आता मुलींचा जन्मदर घटत असून प्रत्येकाने लेक वाचविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले.   यावेळी आरोग्य अधिकारी विशाल कांबळी, प्रा युवराज भामरे, उद्योगपती सुरेश अग्रवाल, ॲड.अनिल लोंढा, ॲड.अविनाश पाटील, अशोक चौधरी,  नरेंद्र पाटील उपस्थित होते.  नंदुरबार नगरपालिका शाळेतील 100 विद्यार्थिनी आणि मतिमंद शाळेतील 9 विद्यार्थिनी असे एकुण 109 कन्यांचे कन्यापूजन मान्यवर आणि जैन, अग्रवाल, सोनार समाज महिला मंडळ व भामरे अकॅडमीचा भगिनी यांचा हस्ते कन्यापूजन सर्व कन्यांचे पाद्यपूजा करून करण्यात आले. यानंतर सर्व 109 कन्यांना नवीन कपडे, वॉटरबॅग आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.   प्रास्ताविकातून हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉ.नरेंद्र पाटील यांनी नवरात्रीत कन्यापूजन करण्याचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमात संघटनेची प्रार्थना जागृती पाटील हिने केली. सूत्रसंचालन राजू चौधरी यांनी, तर आभार प्रदर्शन पंकज डाबी यांनी व्यक केले.  यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समिती आणि लताई आरोग्य धाम यांच्या धर्मसेवकांनी परिश्रम घेतले.