तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। जामनेर तालुक्यातील काही भागात गुरुवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सुर नरीला प्रचंड पूर आला. त्यामुळे सहा गावांना या पुरामुळे फटका बसला आहे. दरम्यान पावसाच्या जोरदारांमुळे पारोळा तालुक्यात आज जनावरांचा बळी गेला आहे.
जामनेर तालुक्यातील सुर नरीला पूर आल्याने रांजणी बेटावर येथे घरांच्या पडझडीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तर शेवगे पिंपरी देवलसगाव कापूस वाडीतही पिकांची मोठी हानी झाली आहे. पारोळा तालुक्यात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे झाले आलेल्या पुराण शेवगे येथील दोन बैल वाहून गेले तसेच अन्य तीन गावांमध्येही पशुधनाचे तीन बळी गेले.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे रात गुरुवारी रात्री पाऊस सुरू असताना घरावर वीज पडून हर्षा गणेश मनोरे या तरुणीचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. बोदवड तालुक्यात २२रोजी पहाटे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या पावसाचा लोणवाड बेटावर व जामठी परीसराला अधिक फटका बसला. कुराहरदो व धोंडखेडा येथील नाल्याला पूर आल्याने काही घरांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. अमळनेर तालुक्यातील कंकराज भिलाली येथील कमलाकर हिम्मत पाटील वय 50 हे बोरी नदीचा पूरात शुक्रवारी वाहून गेले त्यांचा शोध सुरू आहे.