पुणे: पुण्यात नेमकं चाललंय काय? काही दिवसांपूर्वी औंध परिसरात सराफा व्यावसायिकाने मित्रावर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली होती. आणि आता पुण्यातील एक सोसायटीत झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाने म्हटल्या प्रमाणे तक्रार दाखल केली नाही म्हणून वाघोली पोलीस चौकीत स्वतःला पेटून घेतल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिदास अशोक जाधव ( वय २८, रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली ) हा राहणार वाघालीतला आहे. सिद्धी अपार्टमेंट या सोसायटी मध्ये राहतो. त्याचे आणि सोसायटीतील लोकांसोबत सातत्याने वाद होत होता. आज सोसायटीच्या वादातून रोहिदासला बेदम मारहाण झाली. या मारहाणी विरोधात रोहिदास तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आला होता. दरम्यान पोलोसनी या घटनेबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याने पोलिस ठाण्यात राडा घातला आणि पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतले. तरुणाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. तरुणांची प्रकृती गंभीर असल्याचे कळत आहे.