तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरला! सोन्याने प्रथमच गाठला ‘हा’ टप्पा, भाव वाचून फुटेल घाम

जळगाव । जागतिक घडामोडींमुळे सोन्यासह आणि चांदीचा भाव सूसाट आहे. मार्च महिन्यात सोन्याचा तोळा ७० हजारावर जाणार असल्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरलेला दिसतोय. काल शुक्रवारी जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये प्रथमच सोन्याच्या किमतीने ‘जीएसटी’सह 70 हजारांचा पल्ला ओलांडला आहे.

सुवर्ण बाजारातील या उच्चांकांमुळे सर्वजण चक्रातून गेले आहेत. एकीकडे लग्न सराई, दुसरीकडे आगामी काही दिवसांत लोकसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने आगामी काळात सोन्याचे महत्त्व अधिकाधिक अधोरेखित होणार आहे.

जळगावच्या सुवर्णनगरीत शुक्रवारी एकाच दिवसात सोन्याच्या दरात १००० रुपयाची वाढ झाली. यामुळे जळगावात सोन्याचा भाव नव्या उच्चांकीवर पोहोचला आहे. सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ६८,६०० रुपये तर जीएसटीसह ७०,३०० रुपयावर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीत काल ५०० रुपयाची वाढ होऊन सध्या चांदीचा दर ७५,५०० रुपयांवर पोहोचला आहे.

दरम्यान,सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असून या काळात लोक मोठ्या प्रमाणावर सोन्या चांदीची खरेदी करत असतात. मात्र, सध्या सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. याचा मोठा फटका खरेदीदारांना बसत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होत आहे. अशातच आता पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.