---Advertisement---

..तरी आज कोणताही आनंदोत्सव नाही; सत्यजीत तांबे मानसच्या जाण्याने व्यथित

by team
---Advertisement---

नाशिक: पदवीधर निवडणुकीचा विजयाचा आनंद जरी असला तरी मानस जाण्याचे दुःख आहे. त्यामुळे आम्ही विजयोत्सव साधारण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले. याच माध्यमातून  त्यांनी आपला विजय घोषित केल्याचेही दिसून आले.

पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल स्पष्ट होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मतमोजणीच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्येच सत्यजीत तांबे यांनी मविआच्या शुभांगी पाटील यांच्यासह अन्य प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत भरभक्कम आघाडी घेतली आहे. हे चित्र पाहता सत्यजीत तांबे यांच्या विजयाची आता केवळ औपाचारिकताच शिल्लक राहिलेला आहे. मात्र, हा विजय दृष्टीपथात असताना सत्यजीत तांबे यांनी एक ट्विट करुन महत्त्वाची घोषणा केली. नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे बुधवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये निधन झाले होते. मानस पगार हे सत्यजीत तांबे यांचे मित्र आणि समर्थक म्हणून ओळखले जात होते. आपल्या मित्राच्या जाण्याने दु:खी झालेल्या सत्यजीत तांबे यांनी विजयोत्सव साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment