जळगाव : तालुक्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने स्वतः च्या हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली, याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
खेमचंद ज्ञानदेव चौधरी (वय 27, रा.असोदा,ता. जळगाव) असे या मयत हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. ते आसोदा येथे आई, पत्नी, एक मुलगा, भाऊ, वहिनी यांच्यासह राहत होते. नवनाथ मंदिराजवळील हॉटेल निर्भयचे ते मालक होते. त्यांना काही दिवसांपासून आर्थिक चणचण जाणवत आसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
दरम्यान शुक्रवारी 31 मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमास हॉटेलमध्ये कोणीही नसताना हॉटेलच्या मागच्या बाजूला एका शेडमध्ये खेमचंद चौधरी यांनी छताला गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, खेमचंद फोन उचलत नसल्याने त्याचे नातेवाईक त्याला हॉटेलमध्ये पाहण्यासाठी आले असता, त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसून आला. यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. खेमचंद याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे दाखल केले असता तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषित केले.