---Advertisement---

…तर आदित्य ठाकरेंची चौकशी होणार,चंद्रशेखर बावनकुळे

by team
---Advertisement---

नागपूर :  २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येपुर्वी दिशा सालियानचा इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला होता. ती सुशांत सिंह राजपुतची मॅनेजर होती. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप केला होता.

याप्रकरणी आता आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.”कुठलीही चौकशी जेव्हा होते तेव्हा त्याचे पुरावे द्यावे लागतात. जर कुणी पुराव्यासकट त्यांची तक्रार केली असेल तर सरकार चौकशी करेल,” अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. दिशा सालियान मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या एसआयटी चौकशीबाबत ते बोलत होते. त्यांनी पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment