तर मी पदाचा राजीनामा देईल अन्.. ; मनोज जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांचं प्रत्युत्तर

मुंबई । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना मी थांबवलं तर मी पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईल, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मनोज जरांगे पाटील यांचं माझ्या वर विशेष प्रेम आहे हे मला माहिती आहे. राज्याचे सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारातून राज्यातील सर्व मंत्री काम करतात. मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्रितपणे काम करतो. जरांगेंना माझा पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ आहे. त्यामुळे त्या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारावं लागेल’.

‘मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना मी थांबवलं तर मी पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईल. आतापर्यंत मराठा समाजासाठी मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतले आहेत. मी मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी राहिलो आहे. जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. तो अयोग्य आहे, असे फडणवीस म्हणाले.