जळगाव : शासकीय कामात अडथळा आणत शासकीय गाडीवरील चालक तसेच तलाठी यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना शनिवार, ९ रोजी रात्री १२.४० वाजेच्या सुमारास महामार्गावर साई पॅलेस हॉटेलजवळ घडली.तहसील कार्यालयात शासकीय वाहनावरील चालक मनोज विक्रम कोळी (५२) रा. एसबीआय महाबळ, जळगाव हे भोलाणे येथील तलाठी मनोहर शिवराम बाविस्कर हे शासकीय कामात होते. त्यावेळी पद्माकर नन्नवरे (बांभोरी) हा आला. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी पकडलेले ट्रॅक्टर तू सांगितल्याने पकडले गेले,
असा संशय घेत वाद घातला. चालक मनोज कोळी यांना शिवीगाळ करत संशयिताने धक्काबुक्की केली. तसेच तुला सोडणार नाही, असा दम भरला. तलाठी मनोहर बावीस्कर यांनाही संशयिताने धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी चालकाने दिलेल्या तक्रारीवरुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोउपनि गणेश सायकर