तळोदा, : तालुक्यातील मोड येथील भर चौकात चैतन्येश्वर महादेव मंदिरासमोर असलेले एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न ६ व ७ जूनच्या गुरुवार रोजीच्या मध्यरात्री साधारण दीड ते दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरांनी एटीएम व किराणा दुकान फोडण्याच्या प्रयत्न केला. परंतु, दुकानदाराच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला.
६ जूनच्या मध्यरात्री वीज नसल्याची संधी साधत चोरट्यांनी चैतन्येश्वर महादेव मंदिरासमोर असलेले एटीएम व किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु वीज नसल्याने येथील दुकानदार सहज दुकानाकडे टेहळणी करण्यासाठी आला असता, त्याला एटीएम फोडण्याचा व दुकानाचे कुलूप तोडत असल्याचा आवाज आला. हा आवाज ऐकून दुकानदाराने चोर असल्याचे समजताच जोरजोरात आरडा ओरड केली. यामुळे चोरटयांनी दुचाकीच्या मदतीने पलायन केले. सकाळी दुकानदार केवल राम यांनी बोरद पोलीस दुरुक्षेत्राचे हवालदार गौतम बोराडे यांच्याकडे घडलेली घटना सांगितली. दरम्यान लागलीच तळोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, हवालदार गौतम बोराडे, निलेश खोंडे आदी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी एटीएम मशीन व कुलूप तोडण्याच्या प्रयत्न झालेल्या दुकानाची पाहणी केली. यात त्यांना चोरांनी दुकान व एटीएम मशीन तोडण्याच्या प्रयत्न केला परंतु ते त्यांच्याकडून फुटलेच नसल्याचे दिसून आले. त्यांनतर पोलीस यंत्रणेने एटीएमचे प्रतिनिधी विपुल चौधरी यांना तातडीने बोलविले. तसेच नंदुरबारहून श्वान पथक देखील म ागविण्यात आले. परंतु संबंधित चोर पसार झाले आहेत. एटीएम मशीनचे प्रतिनिधी यांनी सांगितले की, एटीएममध्ये कॅमेरे लावलेले आहेत त्याची तपासणी केल्यानंतर तपास लागेल. मशिन इंडिया वन या कंपनीचे असून परिसरातील जनतेला पैसा सहज काढता यावा म्हणून कंपनीमार्फत गेल्या तीन वर्षापासून सोय केली होती. एटीएम फोडण्याच्या पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे पोलिसांपुढे म ोठे आव्हान आहे. परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.