भुसावळ : भुसावळ शहरातील चमेली नगर भागातील २४ वर्षीय युवकाने तापी नदीवरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार, १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. देवेंद्र मधुकर चव्हाण असे मयताचे नाव आहे. या युवकाने आत्महत्या का केली?
याचे कारण कळू शकले नाही. घटनेची माहिती कळताच फैजपूरचे शहरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, उपनिरीक्षक मैनोद्दीन सैय्यद विकास सोनवणे, बाळू भोई, दिनेश भोई, योगेश दुसाणे आदींनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास तरुणाने तापी नदीवर येत अचानक उडी घेतली. ही वार्ता शहर पोलिसांना कळताच त्यांनीही माहिती घेतली असता आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह फैजपूर हद्दीत असल्याने पोलिसांना सूचित करण्यात आले व त्यानंतर फैजपूर पोलिसांनी धाव घेतली. दरम्यान, मयत तरुण तीन बहिर्णीचा एकुलता एक भाऊ असल्याचे सांगण्यात आले