धरणगाव : नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले त्याबद्दल धरणगाव तालुका महायुतीतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फटाके फोडून पेढे वाटून ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, जि, प, माजी सदस्य प्रतापराव पाटील, महायुतीचे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन, भाजप तालुका प्रमुख जिजाबराव पाटील, भाजप शहराध्यक्ष दिलीप महाजन, शिवसेना शहराध्यक्ष विलास महाजन ,विजय महाजन, कन्हैया रायपूरकर,टोनी महाजन, हेडगेवार नगर उपसरपंच चंदन पाटील, राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, महिला तालुका प्रमुख आरती पाटील, दीक्षा गायकवाड, कीर्ती भाटिया, कमलेश तिवारी, कैलास माळी, नगरसेवक शरद कंखरे, नगरसेवक नंदकिशोर पाटील, वाल्मीक पाटील, मच्छिंद्र पाटील, पुणेलाल महाजन, नगरसेवक गुलाब मराठे, बाळासाहेब जाधव, धीरेंद्र कडू बयस,मधुकर निकम, ऍड. आशिष भैया, हेडगेवार नगर सरपंच धनराज सोनवणे, शिवदास पाटील, मधुकर महाजन, रवींद्र जाधव, सचिन पाटील, सुनील चौधरी, सुनील चौधरी, रवी महाजन यांच्यासह शिवसेना-भाजप महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.