मुंबई: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं किल्ले रायगडवर आज अनावरण झालं. या कार्यक्रमाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांची पुण्यात भेट झाली. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये या तिघांची पाणी प्रश्नावर भेट झाली.
यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. सुप्रिया सुळे त्याच भागातून खासदार आहेत. रोहित पवार यांचा ही जवळ मतदारसंघ आहे. त्यामुळे ते सर्व शासकीय बैठकीला गेले असतील, असं संजय राऊत म्हणाले.
तुतारी चिन्हावर काय म्हणाले संजय राउत
महाराष्ट्रातील ११ कोटी जनता हयापुढे हातात मशाल घेऊन तुतारी वाजविणार आहोत. शरद पवारांना अत्यंत चांगलं चिन्ह मिळालेलं आहे. काल जे पी नड्डा यांनी अजित पवार आणि शिंदे समोर प्रश्न ठेवला आहे की तुम्ही कमळ चिन्हावर लढा असे म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया
महाविकास आघाडीची जागा वाटपाची जी चर्चा आहे, त्यावर चिमटा घेण्याची गरज नाही. आम्ही चर्चा अंतिम टप्प्यात आणली आहे. संपूर्ण देशात जागावाटप अत्यंत संयमाने सुरु असेल ते म्हणजे महाराष्ट्रात आम्ही लोकशाहीसाठी निवडणुकांमध्ये काम करत आहे. सर्वांसोबत चर्चा करुनच जागा वाटपाचा तिढा सोडवणार आहोत, असं संजय राऊत म्हणाले.