आजही गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस सर्वोत्तम पर्याय मानला जातो. पोस्टमध्ये पैशाच्या हमीसह चांगला परतावा मिळतो. ग्राहकांना आता 1,11,000 रुपये मिळतील चला तर जाजून घेऊया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.
पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर गुंतवणूकदारांना मोठा लाभ मिळतो. या सरकारी योजनेत तुम्हाला ७.४ टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत आहे. यासोबतच सरकारकडून दर तिमाहीत व्याजदरांचा आढावा घेतला जातो. त्यामुळे यामध्ये व्याजाची रक्कमही बदलू शकते. या सरकारी योजनेत चांगल्या रिटर्न्ससोबतच टॅक्स बेनिफिटचाही फायदा आहे. या योजनेत पैसे गुंतवून दरवर्षी 1 लाखांपेक्षा जास्त कसे कमवू शकता हे जणू घेऊया.
या सरकारी योजनेत तुम्हाला किमान 1000 रुपये गुंतवावे लागतील. यानंतर, तुम्ही त्यातील गुंतवणूक 1000 च्या पटीत वाढवू शकता. यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 15 लाखांची गुंतवणूक करू शकता. त्याची मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे, परंतु खातेदार ही योजना आणखी 3 वर्षांसाठी वाढवू शकतात.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने या सरकारी योजनेत 15 लाख रुपये म्हणजेच जास्तीत जास्त रक्कम जमा केली असेल आणि त्याला 7.4 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत असेल, तर यानुसार त्याला प्रत्येक तिमाहीत 27750 रुपये मिळतील. त्याच वेळी, जर आपण त्याची वार्षिक रक्कम पाहिली तर ती 1,11,000 रुपये होईल.
तुम्ही संयुक्त खाते उघडल्यास, गुंतवणूकीची कमाल मर्यादा ३० लाख रुपये होईल. गुंतवणुकीची रक्कम दुप्पट केल्यानंतर, व्याज दुप्पट करून 2.2 लाख रुपये होईल.
तुम्हाला आयकराच्या 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत सूट मिळू शकते. त्याच वेळी, तुम्हाला मिळणारे व्याज 50,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल.