तुमचंपण ICICI बँकेत असेल खात तर, ही आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी

देशातील सर्वात मोठी खाजगी बँक ICICI बँकेने आपल्या FD च्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यात बँकेने व्याजदरात वाढ करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी, बँकेने 1 एप्रिल आणि 9 एप्रिल 2024 रोजी त्यांचे व्याजदर वाढवले ​​होते. बँकेने बल्क एफडी स्कीम म्हणजेच 2 ते 5 कोटी रुपयांच्या एफडीमध्ये व्याजदर बदलले आहेत.

आजपासून नवीन दर लागू
ICICI बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने 2 ते 5 कोटी रुपयांच्या बल्क एफडीच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीनंतर, बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या बल्क एफडी योजनांवर सर्वसामान्य नागरिकांना 4.75 टक्के ते 7.00 टक्के व्याजदर देत आहे. 1 वर्ष ते 389 दिवसांच्या FD वर जास्तीत जास्त व्याजदर दिला जात आहे. यामध्ये बँक सर्वसामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.२५ टक्के व्याज देत आहे.

ICICI बँकेच्या FD योजनेच्या व्याजदरांबद्दल जाणून घ्या
ICICI बँक 7 दिवस ते 29 दिवसांसाठी बल्क एफडी स्कीमवर ग्राहकांना 4.75 टक्के व्याज दर देत आहे. तर ३० ते ४५ दिवसांच्या एफडीवर ४.७५ टक्के, ४६ ते ६० दिवसांच्या एफडीवर ५.७५ टक्के, ६१ ते ९० दिवसांच्या एफडीवर ६.०० टक्के, ९१ ते १८४ दिवसांच्या एफडी योजनेवर ६.५० टक्के 185 दिवस ते 270 दिवसांच्या FD योजनांवर 6.75 टक्के, 290 ते 1 वर्षाच्या FD योजनांवर 6.85 टक्के, 1 वर्ष ते 389 दिवसांच्या FD योजनांवर 7.25 टक्के, 390 दिवस ते 15. महिने FD वर 7.25 टक्के, 15 महिने ते 18 महिन्यांच्या FD स्कीमवर 7.05 टक्के, 2 वर्षे ते 10 वर्षांच्या FD स्कीमवर 7 टक्के व्याजदर बँक देत आहे.

या बँकेने व्याजदरातही वाढ केली
ICICI बँक व्यतिरिक्त, सरकारी बँक इंडियन बँकेने देखील अलीकडेच त्यांची 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD मध्ये 50 बेसिस पॉइंटने वाढ केली आहे. नवीन दर 15 एप्रिल 2024 पासून लागू झाले आहेत. बँक आता 7 दिवस ते 3 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या FD वर 4 टक्के ते 6.50 टक्के व्याजदर देत आहे.