तुमचेपण केस गळत असतील तर, करा हे उपाय

केसगळती समस्या: अलिकडे धकाधकीचं जीवन, वाढता ताण, वाढतं प्रदूषण, आंघोळीसाठी वापरात येणारं दूषित तसचं क्लोरीनचं पाणी यामुळे केस गळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालीय. दाट केस हवेत असं प्रत्येकालाच वाटत. मग त्या स्त्रिया असोत वा पुरुष. वढचं काय तर केस गळण्यासोबतच ते कुमकुवत झाल्याने केस तुटणे आणि अकाली केस पांढरे होणे या समस्यांनी देखील अनेक जण त्रासले आहेत.

कितीही प्रयत्न करून तुमचे केस वाढत नसतील आणि केसांचे तुटणे बंद होत नसेल तर यासाठी तुमचे डाएट, लाईफस्टाईल आणि केसांची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक जण घरगुती तेल किंवा हेअर मास्कचाही वापर करतात. यामुळे काहीवेळेस फरक पडतो. मात्र हे सर्व उपाय करूनही जर तुमची केस गळती थांबत नसेल तर तुमच्या केसांना बाह्य पोषण नव्हे तर आतून म्हणजेच शरिरातून पोषण मिळणं गरजेचं आहे. या साठी तुम्ही पुढील पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करू शकता.

पालक- पालकमध्ये मोठ्या प्रमाणात आयरन असतं. शरीरात आयरनची कमतरता निर्माण झाल्याने केस गळणं सुरु होतं. खास करून महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान आयरनची कमतरता निर्माण होते परिणामी केस गळतात. यासाठीच आहाराच पालकचा समावेश करणं कधीही उत्तम.

त्रिफळा- त्रिफळा हे केसांसाठी एक उत्तम औषध आहे. यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले अँटीऑक्सिडन्ट घटक केस वाढीसाठी मदत करत. रोजच्या आहारात तुम्ही त्रिफळा चहा समाविष्ट करू शकता.

केसांच्या वाढीसाठी विटामिन सी जास्त गरजेचं असतं. आवळ्यामध्ये विटामिन-सीचं प्रमाण अधिक असतं. त्यासोबतच फायबर, आयरन, फॉलेट, ओमेगा ३ , मॅग्नेशियम आणि कॅलशियम सारख पोषक तत्व आवळ्यामध्ये आढळतात. यामुळे केस मुळापासून मजबूत होण्यास मदत होते.

कडीपत्ता: कडीपत्त्यामध्ये विटामिन, आयरन आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असल्याने केसांचं आरोग्य चांगलं राहतं. कडीपत्ता नियमित सेवन केल्याने केस गळती थांबून तुमचे केस दाट होतील.