नवी दिल्ली: भारतात विकल्या जाणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सेरेलॅक बेबी फूड उत्पादनांची चाचणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश ग्राहक व्यवहार मंत्रालयालयाने पत्र पाठवून भारतीय अन्न सुरक्षा नियामकाला मानक (एफएसएसएआय) दिला आहे. उत्पादनात असलेले प्रमाण साखरेचे आणि तृणधान्याची शास्त्रीय। पडताळणी करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहे. विकसित देश व युरोपीय बाजारपेठांच्या तुलनेत भारत,ऑफ्रिका आणि लॅटिन बेबी फूड अॅक्शन नेटवर्क या अमेरिकन राष्ट्रांसह संस्थेने अहवालातून विकसनशील देशांमध्ये विक्री होत असलेल्या नेस्लेच्या दूध आणि सेरेलॅकसारख्या उत्पादनात अधिक प्रमाणात साखर असल्याचा दावा स्वित्झर्लंड स्थित पब्लिक आय आणि इंटरनॅशनल केला आहे. याची दखल घेत एफएसएसएआयला पत्र पाठवून भारतात विकल्या जाणाऱ्या नेस्ले सेरेलॅकच्या उत्पादनांची चाचणी करण्याचा निर्देश दिल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांनी सांगितले. कंपनीच्या उत्पादनासंदर्भात प्रकाशित अहवाल व लेख याची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
…तर कंपनीवर होणार कारवाई
वृत्तसंस्थेला माहिती देताना केंद्रीय सचिव म्हणाल्या की, अहवालातील माहिती गंभीर आहे. लहान बाळाच्या खाद्यपदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असणे आरोग्यासाठी गंभीर बाब आहे. या प्रकारामुळे विविध आजाराचे धोके उद्भवू शकतात. सुरक्षा मानकासह कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. चाचणीत कंपनीच्या उत्पादनात दोष आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
अहवालातील आरोप
भारतासह विकसनशील व अविकसित देशांत सहा महिन्यांपर्यंतच्या बाळांसाठी विकल्या जाणाऱ्या नेस्लेच्या सेरेलॅक गहू आधारित उत्पादनाच्या शंभर ग्रॅममध्ये सरासरी ६.८ ग्रॅमपर्यंत साखर तर युरोपीय देशात विकल्या जाणाऱ्या कंपनीच्या उत्पादनात साखरेचे प्रमाण प्रती शंभर ग्रॅममध्ये २ ग्रॅम साखरेची पातळी असल्याचे अहवालात म्हटले आहे