तुम्हालापण 9% पेक्षा जास्त व्याज हवं आहे का? मग ‘या’ 5 बँकामध्ये करा गुंतवणूक

बँकांद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणाऱ्या मुदत ठेव सामान्य गुंतवणूकदारांसाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांपेक्षा जास्त व्याज देतात.यामध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या नावाने एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला तुमच्या पैशावर जास्त परतावा मिळतो. यामुळे आर्थिक गरज पूर्ण होण्यास मदत होते. आयकर कायद्याच्या कलम 80TTB अंतर्गत, वृद्ध लोक या उत्पन्नावर 50,000 रुपयांपर्यंतची वजावट मिळवू शकतात. त्यामुळे ते आणखी फायदेशीर ठरते. गेल्या काही काळापासून बँकांकडून एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींवर 4.50% ते 9.50% व्याज देते. 1001 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर उपलब्ध सर्वाधिक व्याज दर 9.50% आहे. बँकेने हे दर 2 फेब्रुवारी 2024 पासून लागू केले आहेत.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 4.60% ते 9.10% व्याज देते. सर्वाधिक व्याज दर 9.10% आहे. हे दोन ते तीन वर्षांच्या कालावधीसह FD वर उपलब्ध आहे. बँकेने हे दर 21 ऑगस्ट 2023 पासून लागू केले आहेत.

इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँकेच्या एफडीवर व्याज
इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँक सामान्य लोकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या ठेवींवर 4% ते 9% व्याज देते. 444 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर जास्तीत जास्त 9% व्याज दिले जाते. सामान्य गुंतवणूकदारांना देऊ केलेल्या दरांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अतिरिक्त व्याज मिळते. हे दर 21 ऑगस्ट 2023 पासून लागू आहेत.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेत, 3.60% ते 9.21% पर्यंतचे व्याज 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना देय आहे. या बँकेत सर्वाधिक व्याज दर 9.21% आहे, जो 750 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर उपलब्ध आहे. बँकेने 28 ऑक्टोबर 2023 पासून हे दर लागू केले आहेत.